पेरनी झोकात आली
पेरनी झोकात आली
1 min
2.9K
पेरनी झोकात आली
ओटी पोटास आली
लावता बीज ते मातीत
अशी अंकूरात आली
कोमेजणे हा गूण
अंत ना आसवांना
भावना पेटत आली
जीवाशी एक झाली..
लावता बीज ते मातीत.....
पर्ण येता ऊमलून
लुसलुस पाने डोले
कळी येता यौवनात
भुंगे डोलत आली
लावता बीज ते मातीत..अशी ..
काय इथले साधेपन
जीव मेटाकुटीस आला
जन्मले पाऊले कधी
तू चालतच का? आली
लावता बीज ते मातीत..अशी..
बसली डोयीवर धरुन
पदर तो लाजेचा,
फुटतो टाहो ह्दयात
मायेच्या ममतेचा
नव नवरी ती, परकी झाली
लावता बिज मातीत..अशी अंकूरत
