पावसाचं एक बरं असतं
पावसाचं एक बरं असतं

1 min

39
पावसाचं एक बरं असतं
तो करील तेच खरं असतं
आल्यावर थांबावं लागत नाही
जाताना सांगावं लागत नाही.
अंदाज त्याला पटत नाही
सहज कुणाला वटत नाही.
सोय आपली पाहत नाही
एका जागी तो राहत नाही.
पैसा ठरवतो नेहमीच खोटा
बिघडला तर अनर्थच मोठा.
हजार डोळे त्याचे हजार वाटा
कोरडा पडला तर होतो घाटा.