पारिजातकाची फुले ( कविता )
पारिजातकाची फुले ( कविता )
1 min
15.3K
पारिजातकाची फुले
सडा होवून पसरली
वेचतांना ओंजळीत
आठवणीत रमली...
पारिजातकाची फुले
चांदणं होवून पडली
जागलेल्या रातीचा
हिशोब मागू लागली....
पारिजातकाची फुले
हसत हसत गळाली
पापणीआड लपलेल्या
आसनांना पुसून गेली....
पारिजातकाची फुले
मातीचा गंध जाहली
मनातल्या भावनांना
हृदयी साठवून गेली...
पारिजातकाची फुले
ओंजळ भरून गेली
रिती होताच ओंजळ
श्वासात भरून राहिली...