STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

पानगळी नंतर ...

पानगळी नंतर ...

1 min
14.8K



कशाला उगाच तेच दुःख उगाळत बसायचं ?

भावनांचा काहुर मनात पुन्हा दाटायचा ...

झाकोळून यायचं आभाळ पुन्ह्यांदा

अन धो- धो पाऊस मनसोक्त बरसायचा



नकोच ती खोटी - खोटी स्वप्नं पाहणं

अन् रात्र- रात्र नाहक झुरत राहणं ...

क्षितिज आभासी तर असतं सदा न् कदा

आकाश - धरतीच कुठं मिलन होत ?


विसरून जावं एक पाहायच्या गोड स्वप्नापरी ...

व्हावं सज्ज नव्या पहाटेच्या शोधासाठी बिनधास्त

तसंही नाही म्हटलं तरी कोण कुणासाठी थांबते ?

आपली पायवाट आपल्यालाच तर शोधायची असते


पीक भरात आलं म्हणजे सर्वच पक्षी गाणी गातात

सुखाचे सारे सोबती ,दुःखाचा वाली नसतो कुणी

आपलं आपणच जडाव पुन्हा बहराव नव्या जोमानं ..

पानगळी नंतर वसंताचा बहर हमखास असतो



Rate this content
Log in