STORYMIRROR

Pandit Warade

Others Romance

2  

Pandit Warade

Others Romance

ओळखीचं झालं

ओळखीचं झालं

1 min
2.1K


सारंच काही शब्दांमध्ये

सांगणं जरुरी नसतं

नजरा नजर होणंही

प्रीतीला पुरेसं असतं


खूपच आवडतं मला

जेव्हा जेव्हा तू बोलतेस

आपल्या मधल्या प्रेमाचं

गोड गुपित खोलतेस


अबोल होतात शब्दही

मौनात जाते माझी भाषा

आपल्या गुलाबी नात्याची

मन करू लागतं आशा 


लाजून हसतेस जेव्हा

गालावर पडते खळी

काळजात शिरून माझ्या

खुलवते मनाची कळी


ओळखीचं झालंय आता

तुझं ते खट्याळ हासणं

हळूच चोरून पाहणं

आणि खोटं खोटं रुसणं


Rate this content
Log in