ओळख
ओळख
1 min
181
असे ओळख जुजबी
छोट्या प्रवासामधली
गप्पांमधे सांगे सारी
नाम धाम गोत्रावली
कधी ओळख रहाते
घट्ट टिकून जीवनी
नाते मैत्रीचे अभंग
राही जन्मजन्मांतरी
कधी ओळख फसवी
असे मुखवट्याचीही
आड दडलेले मुख
कधीतरी दिसतेही
खरी ओळख पटणे
स्वभावाची अवघड
वरवर बोलणे प्रेमळ
आत असते दरड
कधी बोलणे चालणे
वेश असतो फसवा
सूट बूटातील लोक
देती फसवा चकवा
करी पारख नेटकी
नको भुलू बाह्यरंगा
जाण निर्मळ मनाला
ओळखावे अंतरंगा
