न्याय (अभंग रचना)
न्याय (अभंग रचना)

1 min

303
मनुस्मृती सांगे | स्त्री भोगवस्तू ती |
जुलुम करती I तिच्यावरी ॥ १ ॥
बलात्कार सदा | वासना शिकार I
पुरुषी विकार I सोसतेस ॥ २ ॥
स्त्रीत्वाचे रक्षण | तिनेच करावे I
आणि बाळगावे | मौनव्रत ॥ ३ ॥
वर्चस्व पुरुषी | सदोदित घडे |
चारित्र्य शिंतोडे | तिच्यावर ॥ ४ ॥
न्याय मिळवता I दमछाक होते I
खटले सदा ते | प्रलंबित ॥ ५ ॥