STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

नवा सूर

नवा सूर

1 min
158

आता वाटते पुन्हा जगावे

जुन्या स्वप्नांना नव्याने बघावे

विसरून टाकावे सारे व्याप

कशाला बाळगावा जगाचा ताप


नव्या नजरेने पाहावे सारे

उंच उडूनी तोडावेत तारे

झुलावे स्वच्छंदी पाखरासवे

बागडावे फुलावर जेव्हा हवे


मोठ्याने गावे गाणे कधी

झिंगुनी नाचावे स्वप्नामधी

हरवून जावे छंदात आपुल्या

बाहेर काढा भावना त्या लपल्या


स्वप्नांना साकारण्या पुन्हा जगावे

ठाम रोवूनी पाय जगाकडे बघावे

वाटेतले करावेत अडसर दूर

सापडू दे जीवनाचा नवा सूर


नेहमी आपण तेच तेच आयुष्य जगत असतो किंवा जगत आलोय

अशा वेळी काही वेगळ्या गोष्टी आपल्याला आनंद देवून जातात


नव्याने जगण्याची उमेद देतात

आणि त्या करता तुम्ही स्वतः ठरवलेली पण न घडलेली गोष्ट केलीत तर तो आनंद निराळाच असतो


Rate this content
Log in