STORYMIRROR

Anil Date

Others

4  

Anil Date

Others

नशीब

नशीब

1 min
28.1K


जपलेल्या जीवनाचे नाते तुटले आता

विसरल्या मरणाशी नाते जुटले आता ॥धृ॥


कुणी दिला मान केले अपमानीत कुणी

कुणी केले जवळ केले दुर्लक्षित कुणी

मित्र, वैरी, सगे-सोयरे भावबंध सारे

क्षणात एका बंधनातून सुटले आता ॥1॥


धन, वैभव, शक्तीने मिळवला दरारा

बांधले प्रासाद, भूखंड मिळवला सारा

नियतीने फिरवली वक्रदृष्टी तरीही

काळ आला अन श्वास माझे लुटले आता ॥2॥


नश्वर शरीराचे पुरविले लाड किती

सुरक्षेस याच्या उभे केले पहाड किती

पण रोखू नं शकलो मरणाचे पाय मी

जगण्याची ईच्छा पण भाग्य फुटले आता ॥3॥


Rate this content
Log in