STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

नर्तकी

नर्तकी

1 min
27.6K


बांधलेस तू पायी पैंजण पोट घेऊनि हाती।

तालावरती नाचत असते विसरुन सारी नाती।।


थिरकतात तव मृदुल चरण हे तेव्हा मिळतो चंदा।

मिळेल त्यावर पोट भरावे हाच तुझा गं धंदा।।


तुझाच केवळ सखा जीवलग तुला न भेटे कोणी।

क्षणाचेच ते सगे सोबती म्हणती तुजला राणी।।


क्षणभर येणे आणि नाचणे क्षणात निघून जाणे।

असेच असते सर्वांचे या रंगमंचकी जगणे।।


एक श्रीहरी सर्व जगाची हलवी सूत्रे सारी।

तोच झोपवी, उठवी, चाले खेळ तयाचा भारी।।


Rate this content
Log in