नक्की काय असतं त्या पाखरांच्या ओठी
नक्की काय असतं त्या पाखरांच्या ओठी


नक्की काय असतं त्या पाखरांच्या ओठी
काहीतरी त्यांना ही बोलायचं असेल
कुणाचे तरी लक्ष गेले का कधी..??
राघू मैना बोलताना सतत गाणं त्यांच्या ओठी
पण पाखरू होऊन कधी बोलता येईल
असा प्रयत्न केला का कधी..??
गप्प राहून ऐकावं अशी शक्कल लढवली
वाटल खुप वेळा जाणून घ्यावं
पण बोलतील का ते माझ्याशी कधी..??
एकमेकांकडे काही बोलताना मला दिसली
वाटलं तर काही वेळा ऐकावं
कुतूहल म्हणून कोणाच्या मनात आल का कधी..??
त्यांची मैत्री केली की सगळचं हव हवं असत वाटतं
त्यांची काळजी घेतली की मन ही अगदी शांत होत..
अस कोणाला वाटेल का एकदा कधी..??
निष्पाप निरागस मन आहे असे प्रत्येकाला जाणवत
पण आपण बोललो तरी त्यांना ही थोड बर वाटू लागत..
पण अस एकदा होईल का कधी..??