STORYMIRROR

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

निसर्गराजा ( हायकू )

निसर्गराजा ( हायकू )

1 min
13.5K


लहरीपणा

निसर्गराजा तुझा

पाणी पडेना.......१

निसर्गराजा

हिरवी वनराई

ती नवलाई..........२

निसर्गराजा

ते रंग नवतीचे

वाजवी बाजा........३

त्या जलधारा

निसर्गराजा असा

वाहता वारा..........४

इंद्रधनुचे

पहा निसर्गराजा 

उधळायचे...........५

झोंबता वारा

हाच निसर्गराजा

पडती गारा...........६

हा दुष्काळाचा

का रे निसर्गराजा ?

आत्महत्येचा........७


Rate this content
Log in