निसर्ग रक्षण ( सहाक्षरी )
निसर्ग रक्षण ( सहाक्षरी )

1 min

11.8K
निसर्ग रक्षण
करायचे कोणी ?
विद्रुप केलीय
ही धरती राणी !
कचराच सारा
हा सभोवताली
गर्द वनराई
अशी दूरावली
हा विरोधाभास
आता सोसवेना
निसर्गाचा ऱ्हास
डोळा पहावेना
मित्र तोच सदा
निसर्ग आपला
हिरवी ती झाडी
साथ देवू त्याला