Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Others

2.0  

Prashant Kadam

Others

निर्णय !

निर्णय !

1 min
20.7K



असे का झाले काही कळेना

कमी कुठे पडलो ते समजेना

अती झाले का ? लाड आमचे

का सरले ? नाते विश्वासाचे


कधि वाटते आम्हीच चुकलो

वेळीच धाक देण्यास कचरलो

नाहक उगाच गोंजारत बसलो

आम्हीच पाठीशी घालत राहीलो


आम्ही आंधळा विश्वास ठेवला

मायेचाच सतत हात फिरवला

भविष्याचाच फक्त विचार केला

त्याचाच गैरफायदा घेतला गेला


आता मात्र होतय अतीशय दु:ख

हरवून गेलय कुटुंबाचं सख्य

हसणे झालं कायमच दुरापास्त

खंत वाटतें न लावल्याची शिस्त


आता विचार लागेल करावा

निर्णय कणखर लागेल घ्यावा

करीअरला महत्व लागेल द्याव

प्रेमळ वागणं लागेल सोडावं


निर्णय हा तूझ्या भल्या साठी

नाही आमच्या स्वार्था पोटी

या पुढे तरी तू शहाणे व्हावेस

जीवनी अव्वल होवून दाखवावेस


Rate this content
Log in