नागपंचमी
नागपंचमी
धो धो पावसाच्या श्रावणसरी
आनंद होत आहे घरोघरी
रेतीमातीत भरला सुंगध टवटवीत धुंद झाले
मन आला आला नागपंचमीचा सण
नवी नव्हाळी आली माहेराला नागदेवता पुजायला
तुडविले बागडत रान, करवंदाची जाळी
पारंब्याला बांधली फुलांची झोळी
तान्हुल्याला ठेवले झोळीतसमोर होते वारूळ
डोलत होते नाग मजेने वाहीले त्यांना दुध
नैवेद्याला बत्ताशे लाह्या
मनी प्रार्थना सुखी ठेव राया
पंचमीचा हा सण, प्रार्थना सासर माहेरासाठी
आनंदाने दुध प्राशन करा नागदेवता सजवली ठेवली दुधाची वाटी
दुध पिऊन व्हा तृप्त शांत
प्रत्यक्षात घडू दे नागदेवता दृष्टांत ॥