STORYMIRROR

kishor zote

Others

4  

kishor zote

Others

मुंबई पोलीस

मुंबई पोलीस

1 min
26.6K


समुद्रमार्गे घुसला कसाब

त्याच्या नापाक इरादयासह

छत्रपती टर्मिनल्स, ताज हॉटेल

अंदाधुंद अशा गोळीबारासह

रात्री केला निष्पापांचा घात

खनानले सुरक्षा विभाग फोन

आळंबे, करकरे पोलीस दल

तत्काळ तेथे गेले होते धावून

सदरक्षणाय खलनिग्रहणाय

जागले आपल्या वचनास

घातल्या गोळ्या छाताडात

दहशतवादयांना धाडे यमसदनास

अशा मुसक्या आवळल्या 

त्या अजमल कसाबाच्या

दोन दिवसातच रोखल्या

त्या कारवाया तोयब्बाच्या

झाले पोलिस शहीद

घरी आले शौर्य कलेवर

अश्रुंचा फुटला बांध

रचणाऱ्या सरणावर

शूर मुंबई पोलीस

आहे देशाची शान

२६ / ११ चे वीर

हृदयी विराजमान


Rate this content
Log in