मुक्या सावल्यांची व्यथा
मुक्या सावल्यांची व्यथा


तिन्ही सांजेला उन्हाची तिरीपे
अन मनी आशा निराशा घेर धरत आहे
चलबिचल चाहूल कशाची तरी भासत आहे
असेच काहीसे अलवार घडत आहे
अंधार दाटणीला अन
काळोखाची वर्तुळे वळणा वळणावर नाचत आहे
भीतीचे सावट जणू मनी थैमान घालत आहे
असेच काहीसे विपरीत घडत आहे
ढगांशी एक झुंज अन
मेघ बरसुनी आले
परि डोळ्यात दुःखाचे बांध उभे अजूनही आहे
असेच काहीसे अकल्पित घडत आहे
क्षणात उठती डोह, क्षणात संथ लाटा
भावनांचे उथळ किनारे अन
वेदनांचा अंत आहे
सोबत असुनी सदा
मुक्या सावल्यांच्या व्यथा येथे कोण जाणुनी आहे
असेच काहीसे घडत आहे