STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

मरणाचेही भांडवल करणारे गारदी

मरणाचेही भांडवल करणारे गारदी

1 min
14K


निवडणुकीची घोषणा होताच नेते मंडळी जागी झाली

झाडून कामाला लागले , करूया म्हटले मोर्चेबांधणी

जाहीरनाम्याची घोषणा , आनंदाची बरसात झाली

त्यांनी स्वप्नाचा गाव दावंला , आम्हीही हुरळून गेलो

पोळ्याचा बैल सजवावा सणाला , मतदार ही सजला

आश्वासनाच्या पावसानं कधी सहानुभूतीनं भिजला

हा हा म्हणता निवडणुकीचा धुराळा उडाला ...

मतदार सवयीप्रमाणे पुन्हा एकदा बावळा झाला

नानाविध झेंड्याखाली पुन्हा एकदा गुदमरला गेला

जाती पातीच्या राजकारणालाच आपसूक बळी पडला

कामा पुरता मामा , कळंला ना त्याना राजकारणी कावा

खाण्यापिण्यासाठी गुलामी पत्करून जिंदाबाद , मुर्दाबाद गरजला 

सत्तेसाठी घेऊन झोळी ,लाजत आली कमळाबाई

तळ्यात - मळ्यात करीत सावध झाला धनुष्य बाण

पटरी सोडून रेल इंजिन निघालं आश्वासनांचा धूर सोडत

घड्याळ म्हणाल हात मिळवणी करावी की करावा टाटा

तुम्ही आम्हाला वोट द्या , आम्ही फक्त चोट देवू पाहिजे तर गांधीछाप देऊ

पाच वर्षे तोंड न दावू , पाय पडतो तुमच्या ,फक्त एकदा निवडून द्या भाऊ

स्वातंत्र्याने सत्तरी ओलांडली तरी उघड गुपित आम्हाला कधी कळले नाही

ज्याच्या हाती ससा, तोच इथे पारधी , मरणाचेही भांडवल करणारे गारदी  


Rate this content
Log in