STORYMIRROR

Nikita Gavli

Others

4  

Nikita Gavli

Others

मराठी वाघ

मराठी वाघ

1 min
313

सुर्य तळपला शिवनेरीवर,

जन्म शिवबांचा झाला.

असा काही घडवला जिजाऊने,

उदय क्रांतीचा झाला.


स्वराज्याचे स्वप्न मनी,

जमवला मावळ्यांच्या रक्तांचा मेळा.

स्वराज्य निर्मितीचा ध्यास,

मनी सार्यांच्या रुजविला.


करूनी छातीची ढाल,

हा शिवबा माझा लढला.

आला जो वाटेत आडवा,

जागेवर त्यास गाडला.


रयतेचे निर्माण केले विश्व,

लावुनी लगाम गनिमांच्या क्रुरकर्मांना.

लागु दिला नाही धक्का,

आयाबहिनींच्या पदराला.


जगदिश्वराच्या कृपेने ,

जणु तुफाण तो गर्जला.

पाहुणी मराठी वाघ हा,

शत्रुही थर थर कापला.


पाहुणी स्वराज्य निष्ठा,

आई भवानी ही प्रसन्न जाहली.

करण्यास खात्मा शत्रुचा,

तलवार ही हाती दिली.


फडकवुनी भगवा,

करूनी पार हद्द पराक्रमाची.

कार्याची महती त्यांच्या,

साता समुद्रापार पोहचली.


घेऊनी श्वास अखेरचा,

समाधी रायगडी विराजमान जाहली.

येथेच जन्मला शिवबा,

भुमी धन्य धन्य ही जाहली. 


Rate this content
Log in