STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

1.4  

Abasaheb Mhaske

Others

मोजावेत किती राहिलेत डोईवर उन्

मोजावेत किती राहिलेत डोईवर उन्

1 min
27.7K


आयुष्यच जणू सिनेमा झाले, आम्हीच प्रेक्षक

नायक , खलनायक , विदूषकही आपणच झालो

नायिका म्हणाल तर जणू पाहुण्या कलाकार ...

आपण साले नियतीच्या हातचं बाहुलं जणू


आता क्षण ते येणे नाही पुन्हा...

आठवणीतले दिवे उजळती मना- मना

दिवस होते ते मंतरलेले , थोडेसे हळवे ...

कधी रडलो , हसलो खिदळलो आठवते पुन्हा


आयुष्य सरत आले तरी जगणेच राहून गेले...

झाल्या बहुत चुका ... आड आला कधी हेका

चालत राहिलो गप्पगुमान नियती नेईल तिकडे ...

जीवनाचे शिल्पकार आपणच विसरून गेलो


कळलचं नाही बालपण कधी सरलं अन तारुण्य ओसरले

दोर तुटलेल्या पतंगागत आयुष्य सारे भरकटत गेले

कधी दुश्मनांनी डाव साधला कधी स्वकीयांनीच छळले

नात्यांच्या गुंत्यात स्वत्वच हरवून बसलो, पदरी निराशाच आली




कळत - नकळत खूप सारं घडलं, क्षण वेचिता सुख- दुःखाचे...

खळखळून हसलो कधी धाय मोकलून रडलो, साऱ्यांनी साथ सोडली

पायदळी तुडवा कि डोईवर घेऊन नाचा, नीतिमत्तेचीच कास धरली

कुणी प्रेमाची झोळी आपुलकीने भरली ,कुणी आपली औकात दाखवली


डोईवर असावे फक्त छत मायेचे अन भाकरीचेच स्वप्न होते

इवल्याशा सप्नानि सालं प्रत्येकवेळी हुलकावणीच दिली

जाऊ दे जाणून- बुजून होतोच आपण वादळातले दिवे

प्रकाशत रहावं विझेपर्यंत नि मोजावेत किती राहिलेत डोईवर उन्हाळे


Rate this content
Log in