मोगऱ्याचा गंध यावा
मोगऱ्याचा गंध यावा


प्रितीच्या हळव्या झुल्यावर जीव हा माझा झुलावा
बहरल्या माझ्या ऋतूला मोगऱ्याचा गंध यावा (१).
आश्वासक श्वास तुझे, दीप देही पेटलेले
विराहातुर वल्लरीला धुंद गहिरा स्पर्श व्हावा (२).
हे सुखाचे चांदणे मी माळण्याचे वय असे...
स्वप्नी स्वप्ने पाहण्याचा छंद डोळ्यांनी जपावा (३)
अंतरी मृदू भावना, बकुळ पुष्पे उमलली...
एक एका गंध कोषी प्राण मी माझा भरावा (४)