मनाला वेड लागलं
मनाला वेड लागलं


सगळ्यांच्या दूर जावं
मुख चोरून ठेवावं
तुझ्या प्रेमात पडले
हे माझे चुकले
गेली मी निघून कुठे तर
तुझं होईल शांत मन
आठवण कधी आली तर
हसून मोकळं करायचं मन
वाटेच्या दोन्ही बाजूला
हात जोडून राहणार
तुझ्याच विचारात नेहमी
मन माझं गुंतणार
मित्रांच्या तोंडावर गोड
नि प्रेमात भांडणं ठरलं
चुकलं तर माझंच होतं
तुला मी दोषी ठरवलं
बोलली मीही खूप तुला
वाईट वाटून घेऊ नकोस
आज तुझ्यासाठीच लिहिणार
उद्याला मुख नाही दिसणार
लक्षात ठेव वर्ष दोन कशी गेली
कळलं नाही प्रेमात भांडणं करून
केली मस्करी सोबत तुझ्या मी
समोरचं आयुष्य माझं
आता जाईल तुझ्या दूरून
लिहिताना आले होते डोळे
माझेही भरून सांगितलं होतं ना
की करणार स्वतःला
मीच कंट्रोल म्हणून
शांत मनाने झोपशील आता
विचार दूर ठेऊन जरा
सोडून दिलं तुला तर
होशील साहेब मोठा खरा