मी तुझी अर्धांगिनी...
मी तुझी अर्धांगिनी...
1 min
1.5K
.
मी तुझी अर्धांगिनी
सप्तपदीच्या संस्कारासह
अर्पण तुजला सर्वस्व
मी तुझी अर्धांगिनी
तुच माझे पुर्णत्व.
तुझ्या संसारी सौख्याने
बहरले माझे कर्तृत्व
प्रितीच्या रेशमी स्पंदनाने
लाभले मज मातृत्व
मातृत्वाने मनी अलवार
फुलले माझे आयुष्य
मी तुझी अर्धांगिनी
तुच माझे सौभाग्य
संसारी तुझ्या सुखाने
झाले मी संपुर्ण
मी तुझी अर्धांगिनी
तुच माझे अखंडत्व
नाती स्नेहाची ऊमलती
तुझ्याच संसारी नित्य
मी तुझी अर्धांगिनी
तुच माझे आयुष्य
