STORYMIRROR

kishor zote

Others

4  

kishor zote

Others

मी मराठी ( नीरजा )

मी मराठी ( नीरजा )

1 min
41K


शौर्याची येथे गाथा

घाव तलवारीचे

सोसतो

संयमे

परतवतो शत्रूंना

झुकतो येथे माथा


महाराष्ट्र राज्य माझे

रक्तात देशभक्ती

सैनिक

लढती

शहिद होता

कर जुळती माझे


मी मराठी अभिमान

सदा बाळगे

उरी

आनंद

जगात रोवी

झेंडा उंचवतो मान


आर्थीक राजधानी देशाची

मुंबईवर आमचा

हक्क

मैना

गावाकडे राहिली

लेखणी अण्णाभाऊ साठेंची


लावणी नृत्य येथे

शृंगार साजे

अभंग

जीवन

दर्शन घडवी

संत परंपरा जेथे


पुरणपोळी गुलाब जामुन

गोडधोड खाया

ठेचा

तव्यावर

खमंग भाकर

चुरून खावे कालवण


वैचारिक क्रांती घडे

अलौकीक येथे

शांत

संयमी

विद्वत्ता सदा

माणूसकी गाते पोवाडे



Rate this content
Log in