मी आजही तिथे उभा आहे
मी आजही तिथे उभा आहे


माझ्यापासून दूर सखे,
जायची तुला मुभा आहे
तू जिथे सोडलंस मला,
मी आजही तिथे उभा आहे ||0||
कळंत नाही कुठे जाऊ
दिशा मात्र अंधुक आहे
प्रेम तुटून केलंय तुझ्यावर
हिच मोठी चूक आहे
दूर जायचं तुझ्यापासून
हाच मनसुबा आहे
तू जिथे सोडलंस मला
मी आजही तिथे उभा आहे ||1||
सर्व काही घेतलं हिरावून
जसं काही माझ्याकडून
माझ्यावाचून तुझं सखे
राहणार नाही काही अडून
प्रेमाची कोरी पाटी असणारा
मी आठवा अजूबा आहे
तू जिथे सोडलंस मला
मी आजही तिथे उभा आहे ||2||