Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती

1 min
360


सणावारांची रांगोळी सुंदर

सारवलेल्या अंगणात वृंदावन

मराठमोळ्या इथल्या संस्कृतीत

नांदते देवघरात नंदनवन.......

थोरामोठ्यांचा आदर होतो

नात्यांमधला गोडवा जपतो

संत -अभंग-संप्रदायाची

एकोप्याची असते शिकवण.....

मराठी भाषेचा करावा जागर

नववारीत फुलते मराठी नजर

वेद -पुराण-उपनिषदांचे

नव्या पिढीनेही करावे वाचन.....

आमची माती, आमची माणसं

काळी माती, पिवळी कणसं

हिरव्या हिरव्या शेतामधेही

मराठमोळी रुजते आठवण ...!


Rate this content
Log in