महादान-रक्तदान
महादान-रक्तदान


काव्यप्रकार षडाक्षरी
सर्वश्रेष्ठ दान
रक्तदान हेच
जीव वाचविणे
कर्तव्य आहेच (1)
मानव वाचवे
दुसऱ्या मानवा
रक्तगट आणि
क्रॉसमॅच हवा (2)
मानवाला रक्त
मानवाकडून
माणुसकी जाणा
अनुभवातून (3)
रक्तदाता करे
मोठे उपकार
जाणीव रुग्णाला
कृतज्ञता फार (4)
महान दानाने
सार्थक जीवनी
कर्तव्यपूर्तीने
समाधान मनी (5)