मैत्रीचे नाते
मैत्रीचे नाते

1 min

135
मैत्रीचे नाते
हा विशाल सागर
प्रेम आदर ।।
विरहक्षणी
तूच जिवाभावाची
साद मैत्रीची ।।
मैत्रीचा गंध
सर्वत्र परिमळ
नाते निर्मळ ।।
मनी भावना
जे अचूक टिपते
मैत्रीचे नाते ।।
मैत्री असावी
जैसे कृष्ण सुदामा
येईल कामा ।।
अखंड मैत्री
मदतीस तत्पर
धावे सत्वर ।।
फुलावी मैत्री
वेल रूजावा खोल
मायेची ओल ।।
नात्यात राहो
प्रेम, जिव्हाळा, माया
मैत्रीची छाया ।।
मैत्रीचे गीत
आनंदाने गाऊ या
धुंद नाचू या ।।