मैत्री
मैत्री


तुला पाहून कितीही काळानंतर,
मनात फुलते वसंत,
हेच माझ्या मैत्रीच्या नात्यात,
आहे मला पसंत
अगदी घरच्यासारखं तुझं,
मनात माझ्या वावरणं असतं,
मी घसरताना मित्रा तुझं,
सहज मला सावरणं असतं
तुझ्या मनाला माझ्या मनाचा,
रस्ता छान कळू दे,
मैत्रीच्या नात्याने दोघांचीही,
ओंजळ पूर्ण भरु दे
मित्रत्वाचं चांदणं जेव्हा,
मनाच्या आभाळात उतरतं,
तेव्हा त्याच्यासाठी जगायला,
मन आपलं आतुरतं
तुझी मैत्री व्यक्त करणं,
रोज मला जमत नाही,
तरीही माझे मन,
खरचं तुझ्याविना रमत नाही
नसावी मैत्री मुसळधार पावसासारखी,
बरसून थांबणारी,
असावी रिमझिम सरीसारखी,
मनाला सुखद गारवा देणारी
बंध रेशमाचे माझे,
असेच जुळून राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी,
मैत्री सतत पाहू देत