मैत्री
मैत्री


स्वार्थाचा जिथे गंधही नसेल
अशी निस्वार्थी हवी मैत्री।।
मनातील द्वंद्व न सांगता कळावे
अशी अबोला जाणणारी हवी मैत्री।।
मार्ग चुकत असेल तेथे
हक्काने रागावणारी असावी मैत्री।।
नकळत चुका झाल्यास तेथे
सांभाळून घेणारी असावी मैत्री।।
आयुष्याच्या वाटेवर संकटात साथ देणारी
अशी सर्वांच्या आयुष्यात असावी मैत्री।।