माणूस....!
माणूस....!
1 min
28.1K
माणुसकी कधीच हरवत नाही
माणूसही कधी हरवत नाही
माणूसकी शोधणारी माणस हरवतात
माणुसकी शोधण्याच्या नादात
स्वतःलाच हरवून बसतात
माणसास शोधावे लागत नाही
माणुसकीस ही शोधावे लागत नाही
माणसात सदैव माणुस असतो
माणसातच माणुसकी असते
पहा हवतर माणसाचा शोध घेऊन
कधीतरी माणूस म्हणून जीवन जगून
माणूसकीच भेटेल सर्वत्र
माणूस म्हणून जीवन
जगता आले तर...!
