Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Somesh Kulkarni

Tragedy Others

4.5  

Somesh Kulkarni

Tragedy Others

माणुसकीचा अंत

माणुसकीचा अंत

1 min
23.2K


भूक होती पोटात फिरत होती बराच वेळ,

दोन दिवसांपासून होती उपाशी बघत नियतीचा खेळ


माणसावरच्या माणुसकीवर तिचा होता विश्वास ठाम,

तिला मिळायचं दररोज खायला थोडंफार न गाळता घाम


आता तिला लागले होते कुठल्यातरी फळाचे डोहाळे,

पाहत होती ती नारळाच्या झाडाकडे कुणी काढून देईल का शहाळे


एका माणसाने आणली एक थैली काहीतरी होतं तिच्यात,

सगळेजण कुठे बसतात म्हणा एकाच प्रकारच्या साच्यात


त्यानं एक अननस त्या हत्तीणीला घातलं खाऊ,

फळ खायची इच्छा झाली पूर्ण आता गर्भातल्या पिलालाही मिळेल काहीतरी मऊ


कृतज्ञतेच्या भावनेनं बघत त्याच्याकडे गेली ती थोडीशी दूर,

प्राण्यांवर दया दाखवणारेच असतात खरे शूर


जिभेला झाली जखम जेव्हा अचानक झाला अननसाचा स्फोट,

फटाके होते भरलेले त्यात आता मिळेल का कुठे पाण्याचा घोट?


कितीतरी वेळाने सापडलेल्या तळ्यात घेतली तिनं जलसमाधी,

पोटाची भूकच जिवावर बेतली शरीराला नव्हती कुठलीही व्याधी


झाला तिला वाचवायचा प्रयत्न पण तोपर्यंत झाला उशीर,

विश्वासाला गेला होता तडा मृत्यूसाठी झाली होती ती अधीर


आई म्हणून निभावलं कर्तव्य फुलांचं शेवटी होतं निर्माल्य,

तिच्या पिलाला माणूस बघायला मिळाला नसल्याचं नसणार शल्य


Rate this content
Log in