माणुसकीचा आवाज
माणुसकीचा आवाज


हरवला माणूस त्यातली माणुसकी
खुशाल होऊ दे भयंकर कलियुग
जगाच सोडा आपलं बोला आता
माणुसकीला थारा देऊ होईल सतीयुग.
टंचाई माणुसकीची सर्वत्र भासते
माणूस अस्थंगत झालाय नक्की
थांबवू प्रन हा आसुरी शक्तीचा
मनात गाठ बांधू ही पक्की
उरला फक्त आता येथे
मानवरूपी जगात दानव
एकाच ईश्वराची लेकरे
परी भिन्न भिन्न नाव
माणसातील संघर्ष,झगडे
धर्म,धन,भाषा,जातीमुळे वाढले
आपल्यातीलच ठरविले अश्पृष्य
धर्म मार्तंडानी जिने मुश्किल केले
उच्चवर्णीय करतात अन्याय
चातुर्वण स्तोमाणे भर घातला
थोर महात्म्यांनी साद घातली
ज्ञानदेवांनी मानव धर्माला थारा दिला
एकनाथांनी मांडला आदर्श
हीन,दीनांना उराशी कवटाळले
सांभाळून धुरा माणुसकीच
ी
हरिजनांना पंक्तीला बसविले
गुरासारखे राबतात आदिवासी
बुज ना राखली त्यांच्या स्त्रियांची
नको आता गुलामाप्रमाणे जगणे
वागणूक देऊ त्यांना माणुसकीची
काळा,गोरा भेद जातीत देशात
गरीब,श्रीमंत मते मतांतर मनात
मिटलेच पाहिजे विज्ञानयुगात
मानवधर्माची चाहूल करते स्वागत
जमीनदार,सावकार ह्यांच्यातील
मनुष्य जिवंत राहिला आहे का??
सत्तास्पर्धेच्या विषम लोभापायी
अण्वस्त्रांची भीषण निर्मिती का?
नेत्रदान,रक्तदान,कुष्ठरोगी,अपंग
समत्वाची बीज रुजतेय समाजात
माणुसकीचे द्योतक म्हणावे ह्याला
लोंकाच्या स्वार्थी रूढी येत आहे संपुष्ठात.
'हे विश्वची माझे घर 'ही
भावना जोपासा हृदयात
माणुसकीची दिव्य पताका मग
डौलाने फडकेल सर्वत्र जगात.