माणसासाठी कणसात दाणा...
माणसासाठी कणसात दाणा...
1 min
13.5K
खळ्यावरचे खळते जगणे
कागदावरच पडती राशी
माना फिरवती ऊखळी सांधे
नगरामधले गणित उपाशी.. .. १
आशयाचे काळीज ओझे
शब्दकुणबी मळतो खांदा
सालभराच्या सोशिक तोंडी
सण पोळ्याचा रसिक मांडा.....२
हात हिकमती ओरबाडणारे
नागडी होते सुपीक माती
पंगत एकच खाणारांची
राबणारांच्या हजार जाती....३
मांडीवरती दुष्काळाच्या
हंबरणारे दुधाळ चेहरे
पट मांडता महागाईचा
बदली सोंगट्या आपली घरे...४
बुरखा ओढून निजती नगरे
माणुसकीने टाकल्या माना
माती माञ जपते अजून
माणसासाठी कणसात दाणा....५
