STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

2  

Rajesh Sabale

Others

||मांडवीचा तीर ||

||मांडवीचा तीर ||

1 min
2.5K


ओतूर गावाची शोभा सारी, माझा कपर्दिकेश्वर।

चंद्रकोर झाली नदी, गंगा मांडवीचा तीर।।धृ।।

 

स्वप्नी संत तुकोबास इथं, गुरू बाबाजी चैतन्य भेटलेत।

रामकृष्ण हरी मंत्र दिला त्यांनी, तो सारे जपा हृदयात।।

कथा कीर्तन, इतिहास पुराणी, त्याचे दाखले मिळतात।

तुकोबांचे गुरू बाबाजी चैतन्य, तिथं झाले हो समाधिस्त।।

तिथं चंद्रकोर झाली नदी, अन पुढे-मागे वाहे दक्षिणोत्तर।

अशा पुण्यवान क्षेत्री माझ्या, शिव महादेवाचे मंदिर।।१।।

 

दर श्रावणी सोमवारी भक्त येती, मांडवीच्या तीरी।

रांग भक्तांची लागते दर्शना, शिव शंकराच्या दारी।।

काय भक्तीचा महिमा, मी वर्णन करावा मुखाने।

एका लिंबावर तरती कसे, ओल्या तांदळाचे दाणे।।

तांदळाच्या पिंडी बघण्यास वाहे, भक्तांचा महापूर।

मांडवीच्या तीरी वसले आहे, भाव भक्तीचे मंदिर।।२।।

 

दर श्रावण मासात, माझ्या ओतूर गावात।

एक मास चालतसे, लई उत्सव जोरात।।

कुस्ती खेळण्यासाठी मल्ल, आखाड्यात येती।

लहानथोर बायकापोरं सारी, मजा-मौजेत रंगती।।

हरपून जाते मन येता, रिमझिम पावसाची सर।

दर श्रावणी सोमवारी, फुले नदी मांडवीचा तीर।।३।।

 


Rate this content
Log in