STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

माझं स्वप्न...

माझं स्वप्न...

1 min
19

माझ्या शेतकरी बापाचं होतं सपान मोठं,

लेकरं शिकून मोठी व्हावी, पाहावं त्यांचा थाट


याच सपनापाई, बाप राबला जन्मभर,

घेऊन गरीबीचा शाप, कर्जाचा डोंगर


पाहात होतो डोळ्यांनी, बापाचं ते हाल,

बाप सांगायचा आम्हा, शिक्षणाचं मोल


शिकून साहेब व्हा पोरांनो, हेच सपन माझं,

सांगून माझा बाप, राबराबायचा रोज


केली एकच जिद्द, बाचं सपन पूर्ण करण्याची,

साहेब होऊन, श्रण आई-बापाचे फेडण्याची


रात्रंदिस अभ्यास, नाही डोळ्याला झोप,

साहेब व्हायचं! एकच सपन होतं


कलेक्टर व्हायचं म्हणून, मोठी परीक्षा दिली,

आई-बाबासह मला ओढ निकालाची लागली


आनंदानं नाचू लागलो, पहिला नंबर राज्यात,

सपन बाचं पूर्ण केलं, फोटो आला पेपरात


पेढे घेऊन धावत, गाठलं आधी घर,

बाप होता शेतात, घरी तो सावकार


गेलो बाच्या भेटीला, विश्वासच बसत नव्हता,

गळफास घेतलेला बाप, झाडाला लटकत होता


कोसळलो धरणीवर, झाला साराच अंधार,

कर्जापायी बाप माझा, गेला सोडून सारं


सपन बाचं पूर्ण केलं, बाच सोडून गेला,

स्वप्नांचा माझ्या कसा, चुराडाच हा झाला...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy