माझी माय
माझी माय

1 min

11.6K
माय व्हती पिरमाची
मऊ अक्षी साईवानी
माया पोटात व्हटांत
झरा पिरमाचा मनी
जल्म दिधला तियेने
गोष्टी पढवल्या चार
संस्कारांचे बळ दिले
वंगाळासी ठेव दूर
रेखा आयुष्याची माज्या
तिने खुबीने रेखिली
श्रद्धा सबूरी मनात
आचरणे भिनविली
बाय सम्हाळून -हावं
नगं लगालगा करु
लीन थोरांशी -हावं
नगं घोडं गं दामटू
बोली मायची कानांत
आठवते मनोमनी
कशी सोडून गेलीस
न्हाई मजला पुसोनी