माझा छंद
माझा छंद
1 min
396
शब्दांना जुळवणे शब्दांशी
जडला छंद मला आगळा
यमकाने बोलावे अर्थाशी
काव्यसंवाद हा वेगळा
या छंदावर जडला जीव
श्वासात भिनली कविता
रक्तात मिसळले शब्द
कवितेच्या प्रेमात पडता
जगणे शिकले मी
जगण्याची इच्छा नसताना
छंदाने लिहिले आयुष्य
आयुष्याची कथा रचताना
आता तर या छंदाशी
घट्ट मैत्री झाली ..
मी जोपासण्या ही मैत्री
कवितेची मैत्रीण झाली .