लबं लबं झालं शेतं
लबं लबं झालं शेतं


लबं लबं झालं शेतं, शेतं पवळे मानिक
अथांग मोत्याची रास, रास पाण्याची ती खास।।
आस खिरापत देवा ,देवा जन जनार्धन
जन जन ल्ई खुश, खुश राजं रजवाड।।१।।
पै पाहुणे नि चाकरं, चाकरं आणि नौकरं
पक्षु पक्षी जनावरं,जनावरं ते चौखुरं।।२।।
खुरात नक्षी अंबर, अंबर पृथ्वी भेट
सुक्ष्म स्वरुप देवा, देवा नारायण भेट।।३।।
ऋतु चक्र दिनरात,रात पहुडे मुलूख
झुंजूमुंजू ती पहाट, पहाट ओवी दळतं।।४।।
भास्कर गातो भूपाळी,भूपाळी जीवन कृपा
जीवसृष्टी अहोरात्र,अहोरात्र मायबापा....।।५।।