लालपरी
लालपरी
1 min
85
अनेकांच्या सुखदुःखाच्या प्रवासाची साथी
सगळ्यांना वाटे ती जवळची
सरळ रस्ता असो वा नागमोडी
सुखरूप प्रवासी पोचवण्याची तिची जबाबदारी
रुमाल असो वा सामान
गर्दीत प्रवाशाची शक्कल सीट मिळवण्यासाठी
खिडकीची सीट मिळणे म्हणजे अवोभाग्य
होई प्रवास सुखमय
अश्या ह्या लालपरीने वर्ष पाहिली खूप
लाल रंगाने खुलते तिचे रूप
म्हण्टलं तर ती फक्त प्रवासा साठी
पण खूप जणांच्या ती मात्र लालपरी म्हूणन कायम आठवणी
