कविता माझी
कविता माझी
1 min
15K
कविता माझी बहरावी
मुक्तपणे विहरावी
स्वच्छंदपणे फुलावी
सुगंधा परि दरवळवी
कविता माझी दिसावी
दर्पणा परि नसावी
शास्वत नाते जपावी
डोळ्यातूनी व्यक्त व्हावी
कविता माझी असावी
शब्दांचेच खेळ खेळावी
त्या पल्याडही ती जावी
भावार्थात चिंब ती व्हावी
कविता माझी तुम्ही पहावी
पळभरात आख्खी वाचावी
सर्वांना हवीशी वाटावी
कविताने कविता अशी बहरावी
