Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankit Navghare

Tragedy

3  

Ankit Navghare

Tragedy

कविता एक आजार

कविता एक आजार

1 min
148


खूप सारी अक्षरे, 

कागदे आणि लेखणी 

मग बनलेल्या कविता 

हा संसार फार झाला


काहीबाही शब्दांचा

खेळ करतोय वाटतं

कधी कधी हा विचित्र 

आजार फार झाला


डोळ्यांमधुनी घरंगळत 

आली आसवे कारण

कदाचित डोळ्यांना 

त्यांचा भार फार झाला


खरं काय खोटं काय

सारेच बिकावू निघाले

चाललेला हा आसवांचा 

इथे बाजार फार झाला 


ठेवल्या होत्या थोड्या

संवेदना जपून पण 

आज नकळत क्षणी

हृदयावरी वार झाला 


कविता उरल्या पण 

त्यांना लिहिणारा कवी 

कुठल्या तरी चकमकीत 

तो मात्र ठार झाला     


Rate this content
Log in