कष्टाचे मोल
कष्टाचे मोल
कष्टाचे मला द्या मोल
हेच गरीब अत:करणाचे बोल
काय मागितले आम्ही, आम्हाला आमच्या हक्काचे द्या मोल.
नको आम्हाला सोने चांदी नको आम्हाला एँशो आराम
खातो तेच आम्ही जे कष्टाने उगवतो
दुसऱ्याच खाणे मानतो आम्ही हराम.
नको आमच्या नावाचे अवधान उसलू
नको आमच्या नावाने कोणाला छळू
शेतकऱ्याचे मन ना ते कोणी जाणले
मेलेल्याला नका आता तरी छळू
मेलेल्या टाळूचे खाणे लोणी नको
आता उघड्या डोळ्यांनी सत्य बघ
आता कष्टाचे मोलाचे पण द्यावे
मग मोल कुठे आज माझ्या राजा शिवाजी आता.
याच मातीत थोराची थोरवी गायली हीच माती त्यांनी पावन केली
येथे रक्त आमच्या कष्टाचे सांडते
राजकारण आमच्यापाई आता केले जाते
नको हे स्वार्थी राजकारण
आता बदला हो आपले समीकरण
फक्त मला द्या माझ्या कष्टाचे मोल
हेच गरीब अंत:करणाचे हे बोल
हा विद्रोह माझ्या भावनांचा
हा खेळ माझ्या हक्काचा देऊन बाजार भाव त्यांना
मिळो सन्मान आता तरी, आधार द्या जगण्याचा.
वेदनाचा उचलला थोडा भार झोपडी नाही मनात
जगवा शेतकरी जगवा देश वाचवा आता गरीबांना
जगण्याचा मोका.
