STORYMIRROR

काव्य रजनी

Romance Others

3  

काव्य रजनी

Romance Others

कशी सख्यारे

कशी सख्यारे

1 min
11.9K

कशी सख्यारे

सर बेधुंद पावसाची

तुझ्यासवे चिंब भिजण्याची

भाव मनातील आपल्या

नाचून व्यक्त करण्याची


कशी सख्यारे

सर बेधुंद पावसाची

मातीच्या मोहक सुवसाची

गंध प्रेमाच्या अपुल्या

संगतीत दरवळ करण्याची


कशी सख्यारे

सर बेधुंद पावसाची

तुझ्यासवे गारा वेचन्याची

ओलावा नात्यातील आपुला

जपून घट्ट करण्याची


कशी सख्यारे

सर बेधुंद पावसाची

इंद्रधनू डोळ्यात साठावण्याची

रंग जीवनाचे आपल्या

मुक्तपणे उधळण करण्याची


कशी सख्यारे

सर बेधुंद पावसाची

तुझ्यामाझ्या प्रेमाला

लागोना नजर कुणाची

सर बेधुंद पावसाची

सर बेधुंद पावसाची................


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance