कर्म...
कर्म...


लबाडीच्या दुनियेमध्ये
माझ्याकडून
पाप करून घेऊ नका
मी कोणी पुण्यवान नाही
लुबाडले तुम्ही मला
मीही लुबाडून खाईनं..
सोडुन दिले फकीर बनून राहणं
सत्य हे सत्यच आहे
हे सखे जुगार खेळातील पत्ते आहे
खेळ आहे खोट्याचा सारा
कोणी सांगत लबाडीच्या दुनिये मध्ये
कर्म करून उपाशी मारा.
जिंकलं सत्य तर गमावून बसाल,
 
;मेल्यावर नाव काढतील,
जिवंतपणे लाताडतील,
हरवणं आपल्याला नाय जमणार,
कर्म आहे माझं,
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार.
खोट्या जणास काय सांगावे,
करेल ते इथेच फेडावे.
प्राणात एवढे बळ नाही की,
हे ओझे पेलावेल...
लबाडीच्या दुनियेत,
माझाकडून पाप करून घेऊ नका
भीक मागणार नाही
देणार पण नाही....
सज्जन बनून मेलो तर
ये भाड राजकारण करतील
वाटून तुकडे करतील....
लबाडीच्या दुनियेत भाग्यवान हो
म्हणून पाप करून घेऊ नका..