STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

करावं आत्मपरीक्षण...

करावं आत्मपरीक्षण...

1 min
14.2K


स्वतःच्या  मनातल्या मनात रमावं कधी - मधी

स्वतःला हि प्रश्न विचारावेत कधी - कधी ...

द्यावी स्वतःलाच शाबासकी कधी - कधी

कधी - कधी, मनाचं ऐकावं, भांडावं स्वतःशीच

 

सर्व दुःखाचं मूळ स्वतः आपणच तर असतो

आपलेच कच्चे - पक्के दुवे , दुश्मन हेरतो

म्हणून तर तो जिंकतो आणि आपण हरतो

करावं आत्मपरीक्षण, सारं गुपित हुडकावं ...

यश अपयश आपणच जबाबदार धरावं

आपण कुठे कमी पडलो हे शोधावं ...

कुठे अडखळलो, धाडस कुठे कमी पडलं ?

मेहनत कमी, वेंधळेपणा, कि उतावीळपणा नडला

यश मिळताच एवढंही हुरळून जाऊ नये कधी

अपयश आलेच तर कोलमडून पडू नये कधी

अपयश हि यशाची पहिली पायरी समजून चालावं

अनुभवातून शिकावं ..उद्या असेल नसेल कुणी सांगावं ?...

दोष कुणाला कशास द्यावा ? सारे घ्यावे आपल्याच माथी

प्रेमानं माणसं जोडावीत, नडली ती सोडून द्यावीत तिथेच

चालत राहावं विश्वासानं. संधीच सोनं करावं , यश मिळतेच

नीतिमत्तेला कधी न सोडावं, आपल्या हातून विधायक घडावं ...


Rate this content
Log in