कोरोना
कोरोना
1 min
222
कोव्हिड कोव्हिड
करत होता
चीनमधून आला
सांगत होता
कोरोना मानवाची झोप
मोडत होता
लाकडाऊन महामाई
वाढवत होता
माणुस माणसालाच
घाबरत होता
जो तो आपल्यापासून
दुरावत होता
आजाराला घाबरून
पळत होता
तोंडाला मास्क लावून
लपत होता
दवाखान्यात नंबर
लावत होता
जीवाच्या आकांताने
धावत होता
छातीत कफाचा गोळा
साचत होता
व्हेंटिलेटर प्रत्येकाला
लागत होता
जीवन मरणाचा फेरा
चुकवत होता
मरणाच्या दारात यमराज
उभा होता
निसर्गाशी गद्दारी आपण
करत होता
दुष्परिणाम मानवच
भोगत होता
म्हणून तर सांगतो
झाडे लावा झाडे जगवा
निसर्गाशी हितगुज करा...