कोडं
कोडं


तुझ्या येण्याने, सगळंच बदललंय
खूप दिवसांपासूनचं, कोडं अचानक सुटलंय
सोडण्याचा प्रयत्न, नक्कीच दोघांनीही केलाय
पण सुटण्याला वेग, फक्त तुझ्या येण्याने आलाय
आता तू आणि तूच आहेस, बोलायला आणि लिहायला
बघायला खूप काही आहे, पण गरज काय दुसरं पाहायला
पाहतोय तुलाच सतत, जेव्हापासून आलीस
करमत नाही जराही, थोडा वेळ जरी दूर गेलीस
दुरावा तो काय, आता सहन होत नाही
उघड्या डोळ्यांनी काय तो, रोज नवी स्वप्न पाही
स्वप्न तुझी आणि माझी, त्यात तू आणि मी
संसाराच्या शेतीत बघ, पेरतोय आता सुखाचं बी
उगवेल सगळं चांगलं, दोघांच्या प्रयत्नांनी
कोडी सुटतील सारीच, आपल्याच या हातांनी