STORYMIRROR

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

कल्पना

कल्पना

1 min
14K


 

चौथीच्या वर्गात

रिकाम्या तासाला

घ्यावे का वाचन?

वाटले मनाला.

विद्यार्थ्यांसोबत

मारल्यात गप्पा

विषय आवड

विचारली त्यांना.

मराठी गणित

इंग्रजी प. अ. का?

प्रत्येक आवड

सांगती वेगळा.

शिवरायांचा तो

इतिहास वाचा

सांगीतले मग

उघडा पुस्तका.

वाचतांना काही

अर्थ लागला ना

काय होतेय ते

मलाही कळेना.

दोन्ही अर्ध्या ओळी

सलग वाचता

चुकीची कल्पना

कळली हो त्यांना.

 


Rate this content
Log in