STORYMIRROR

Prashant Shinde

Others Tragedy

3  

Prashant Shinde

Others Tragedy

कलियुग.!

कलियुग.!

1 min
4.8K


कलियुगाची ही करणी

करावी लागते मनधरणी

तेव्हा मिळते मधाची बरणी


राजा असला जरी

आपला सिंहासनी

तरी पट्टेवाल्याची मिजास खरी


यंत्रणा दरबारी

भरली असता माजोरी

चालणार काशी शिरजोरी


कार्यभाग आपला

ज्याच्या हाती त्याशी

करणे सलाम भाग पडते


कलीयुगाचे असे

वेगळेच दर्शन

हरघडीस आपणास रोज घडते


आला दिस तो

आनंदाने पार पाडणे

हेच कर्म मग हाती उरते


शेपूट श्वाना ची सरळ करणे

हे आपले कार्य नव्हे

ब्रह्म देवालाही नाही जमणे तो आपला घास नव्हे


तुझं बी राहू दे माझं बी राहू दे

हाच मार्ग असे कलियुगी जगण्याचा

जाण कश्यास हवी मग सौख्य आपले आपण भोगण्याला


सौख्य आपले आपल्या हाती

हेच सत्य या धरणीवरी

वहावे सारे परमेश्वर चरणी हीच सुखाची नांदी खरी....!


आपले सुख आपल्या हाती हेच सत्य!!!


Rate this content
Log in